gX²Jwê {dÇb bú_rZmW &
Zah{a {ed{XZ Ho$garZmW &&
श्रीसंत नरहरिनाथ महाराज यांचा जन्म व अध्ययन हे पैठण येथे झाले व पुढे राजमाता श्रीजिजाबाई यांचे बंधूंपैकी श्रीजगदेवरावराजे जाधव यांनी श्रीनरहरीनाथ महाराजांना श्रीबालाजी महाराज मूर्ति मिळाल्यावर राजगुरू म्हणून श्रीक्षेत्र देऊळगांव राजास बोलावले. श्रीसंत नरहरिनाथ महाराजांनी आपल्या संत लक्ष्मीनाथ,संत महिपतीनाथ, व संत नारायणनाथ महाराज या शिष्यांना महाराष्ट्रसह अनेक राज्यात नाथ परंपरेच्या प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य केले व श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे शके १७१५ साली समाधी घेतली.
गेल्या सव्वादोनशेहून अधिक वर्षे या नाथपरंपरेचे प्रबोधनाचे व सेवेचे कार्य श्रीसंत विट्ठलनाथ महाराज, श्रीसंत गणेशनाथ महाराज, श्रीसंत गौतमनाथ महाराज, श्रीसंत भानुदासनाथ महाराजांच्या रूपाने अखंड अविरत सुरू राहिले व आज परमपूज्य श्रीगुरुवर्य मोहननाथ महाराजांच्या शुभाशीर्वादाने, पावन सहवासाने या परंपरेच्या सेवा-विस्तार कार्याची मोठी नांदी होत आहे.
© 2025 Narahari Nath Maharaj Sansthan. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper