nath-sansthan-banner-img

संस्थान

देऊळग्रामी वास तुझा भक्त करिती अर्चन ।
जन्मभूमी प्रतिष्ठाण तेथे गुप्त अनुसंधान ।।

nath-about-bottom-img

श्रीसंत नरहरिनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार

श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच वैदिक व वारकरी परंपरेची, सनातन धर्म परंपरेची सेवा करण्याऱ्या महनीय व्यक्तीस श्रीसंत नरहरिनाथ महाराज यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. किमान चार तपांहून अधिक काळ ज्यांनी धर्म कार्याकरिता आपले जीवन व्यतीत करून समाजाच्या प्रबोधनासाठी, उत्कर्षासाठी व उन्नतीसाठी अखंडीत कार्य केले अशा व्यक्तींच्या अविरत व अलौकिक सेवाकार्याला वंदन म्हणून व नाथपरंपरेचा कृपाशीर्वाद म्हणून हा पुरस्कार दिला जातो. सन २०१७ पासून प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान समारंभ श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे अथवा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो.

पुरस्काराचे स्वरूप

रोख रक्कम ₹११०००/-, महावस्त्र शेला, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते.

सन २०२१ पर्यंत पुरस्काराचे मानकरी

सन - २०१७

हरिभक्तीपरायण, वेदान्तवाचस्पती वै.श्री.जगन्नाथमहाराज पवार

(देवगिरी,संभाजीनगर)

स्थळ - पुणे विद्यापीठ पुणे

सन - २०१८

हरिभक्तीपरायण श्री.विष्णुबुवा चक्रांकित महाराज

(श्रीक्षेत्र आळंदी)

स्थळ - श्रीक्षेत्र देऊळगाव राजा

सन - २०१९

हरिभक्तीपरायण शांतिब्रह्म श्री.मारोतीमहाराज कुरेकर

(वा.शि.संस्था.श्रीक्षेत्र आळंदी)

स्थळ - श्रीक्षेत्र आळंदी देवाची

सन - २०२०

पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्री.बाबासाहेब पुरंदरे

(पुणे)

स्थळ - पुणे

सन - २०२१

पण्डितप्रवर वेदाचार्य श्री. गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी

(श्रीक्षेत्र काशी)

स्थळ - श्रीक्षेत्र आळंदी देवाची

nath-divider-icon-img