हे पुण्यकार्य वाढवावे । सत्कर्मे लोकी रुजवावे ।
गो-संत पूजने । काळ सार्थकी घालावा ।।
सध्याची अध्यात्मिक व सामाजिक परिस्थिती पाहाता गुरुकुल शिक्षण पद्धतीची मोठी आवश्यकता भासत आहे. वेद काळापासून ते सध्याच्या आधुनिक काळापर्यंत सामर्थ्यशाली गुरू शिष्यांची परंपरा जी अखंडित भारताच्या अध्यात्मिक व सामाजिक उत्कर्षाचा व उन्नतीचा केंद्रबिंदू ठरली आहे, त्यामध्ये महर्षि वेद व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि वाल्मिकी, आद्यगुरू मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, श्रीमदाद्य शंकराचार्य, संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज, आदी ऋषींची, संतांची नावे तेजाळत आहेत.या सर्वांच्या अतुलनीय कार्याने भारतीय वैदिक संस्कृतीला अध्यात्मिक बैठक, अध्यात्मिक शक्ती व विचारधारा प्राप्त झाली, जी सर्व मनुष्यमात्रांना समृद्ध, सशक्त व देव, देश व धर्माच्या सेवेसाठी प्रेरित करणारी आहे. याच गुरुशिष्य परंपरेचा महान आदर्श समोर ठेऊन, अनंत कालापासून चालत आलेल्या वैदिक संस्कृतीची जोपासना करण्यासाठी, वेदाध्यापनाचे कार्य करण्यासाठी व वेद व विज्ञान यांच्या द्वारे राष्ट्राला व देशाला सशक्त करणारी पिढी निर्माण करण्यासाठी महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय सुरू करण्यात आले आहे.
वर्तमानामध्ये शुक्ल यजुर्वेदाचे अध्यापन या ठिकाणी केले जात आहे व भविष्यामध्ये चारही वेदांचे अध्यापन करण्याचा संस्थानचा मानस आहे. वैदिक शिक्षणाबरोबरच इंग्रजी, कॉम्प्युटर, गणित, इत्यादी सर्वांगीण विषयांचे शिक्षण देखील गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना दिले जाते.विशेष म्हणजे या करिता कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता निवास, भोजनासह चार वर्षे संपूर्ण शिक्षण हे विनामूल्य आहे. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल व समृद्ध भविष्यासाठी इच्छुक माता पित्यांनी आपल्या मुलाला इथे अवश्य प्रवेश द्यावा. विद्यालयातील अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता व इतर माहितीकरिता विद्यालयाचे महितीपुस्तक डाउनलोड करावे. संपूर्णपणे भक्तजनांच्या सहकार्यातून सुरू असणाऱ्या या सत्कार्यास आपण यथाशक्ती सहकार्य करावे व या भगवद्कार्यात संमिलीत व्हावे, हे नम्रपूर्वक निवेदन!
कोणत्याही प्रकारचे सेवा सहकार्य करण्याकरिता सेवा सहयोग यावर क्लिक करावे.
© 2025 Narahari Nath Maharaj Sansthan. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper