nath-upkram-banner-img

उपक्रम

हे पुण्यकार्य वाढवावे । सत्कर्मे लोकी रुजवावे ।
गो-संत पूजने । काळ सार्थकी घालावा ।।

nath-about-bottom-img
nath-warkari-clg-img
nath-warkari-logo-inline-img
nath-warkari-clg-logo

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला व त्याला बैठक दिली ती श्रीसंत नामदेव महाराज, श्रीसंत सावता महाराज, शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज, जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज आदी संतांनी. तसेच अलीकडच्या काळात अनेक साधू सत्पुरुषांनी संपूर्ण महाराष्ट्रसह अनेक राज्यांत वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराचे महान कार्य केले आहे, वारकरी संप्रदायाची शुद्ध परंपरा जनमानसात रुजवली आहे.वेद हे जसे आपल्या धर्माचे मूळ आहेत, तसेच श्रीमद्भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे आणि भगवती ज्ञानेश्वरी हा गीतेवरील अनमोल अलंकार होय.


रामायणामध्ये आचरणशील श्रेष्ठ जीवन कसे असावे, हे सांगितले आहे. श्रीमद्भागवतात श्रेष्ठ भक्तीचे दर्शन घडविले आहे. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये या सर्व ग्रंथांचा आशय तर आहेच पण सखोल विज्ञान व गूढ अद्वैत तत्वज्ञान अगदी सोप्या शब्दात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. गीतेतील प्रत्येक श्लोक, ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी, श्रीतुकोबारायांसह सकल संतांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंग म्हणजे एक एक मंत्रच होय.


याच संतवाङ्मयाचे शिक्षण घराघरांत पोहोचावे, आचारशुद्ध व सेवाव्रताने वारकरी संप्रदायाची परंपरा जतन करणारी पिढी निर्माण होऊन वारकरी संप्रदायाचा अखंड भारतात प्रचार व प्रसार व्हावा व वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समृद्ध व सशक्त राष्ट्र निर्माण करणारी युवा पिढी तयार व्हावी, या उदात्त हेतूनेश्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय सुरू झाले आहे.जिथे संस्कृत, संत वाङ्मय, तत्वज्ञान, गीता, उपनिषद, इत्यादी विषयांचे व कीर्तन व प्रवचन या विषयीचे समग्र शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.वारकरी शिक्षणाबरोबरच इंग्रजी, कॉम्प्युटर, गणित, इत्यादी सर्वांगीण विषयांचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विशेष म्हणजे या करिता कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता निवास,भोजनासह चार वर्षे संपूर्ण शिक्षण हे विनामूल्य दिले जात आहे.


आपल्या पाल्याच्या उज्ज्वल व समृद्ध भविष्यासाठी इच्छुक मातापित्यांनी आपल्या मुलाला येथे अवश्य प्रवेश द्यावा.विद्यालयातील अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता व इतर माहितीकरिता विद्यालयाचे महितीपुस्तक डाउनलोड करावे.संपूर्णपणे भक्तजनांच्या सहकार्यातून चालू असणाऱ्या या सत्कार्यास आपण यथाशक्ती सहकार्य करावे व या भगवद्कार्यात संमिलीत व्हावे हे नम्रपूर्वक निवेदन!


कोणत्याही प्रकारचे सेवा सहकार्य करण्याकरिता सेवा सहयोग यावर क्लिक करावे.

विद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील क्षणचित्रे