nath-upkram-banner-img

उपक्रम

हे पुण्यकार्य वाढवावे । सत्कर्मे लोकी रुजवावे ।
गो-संत पूजने । काळ सार्थकी घालावा ।।

nath-about-bottom-img
nath-goshala-img

कृष्णप्रिया गोशाळा

गुरुकुलामध्ये गोशाळेला व गोसेवेला अनन्य साधारण महत्व आहे. विद्यार्जनाच्या काळात विद्यार्थ्याने केलेली गोसेवा ही अधिक पुण्यप्रद असते. या करिता वैदिक व वारकरी विद्यालयाबरोबरचकृष्णप्रिया गोशाळा सुरू करण्यात आली आहे. गोपालन, गोसंवर्धन व गोसंरक्षण हा या गोशाळेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये गोदान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितले आहे. समाजातील सर्व उदार दात्रुत्ववान गोभक्तांनी, भाविकांनी या गोशाळेकरिता गोदान करून अथवा आपला स्वेच्छेने यथाशक्ती सेवा सहकार्य करून या सत्कार्यात सहभागी व्हावे व गोमातेची कृपा प्राप्त करून घ्यावी.

nath-library-img

सिध्दांतसार ग्रंथालय

वाचन हे मनुष्याला बौद्धिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने जिवंत ठेवते. जो वाचतो तोच वाचतो. मग ते क्षेत्र कोणतेही असो. त्यातही धर्म शास्त्रीय ग्रंथ, संत वाङ्मय हे अनंत काळापासून ते आजपर्यंत मनुष्याला प्रत्येक पथावर व प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करत आहे. षडदर्शने, ज्योतिष, काव्य, उपनिषदे, स्मृती, यांसह अनेक विषयांचा संग्रह असलेले व चारशे वर्षांहून अधिक पुरातन व हस्त लिखित ग्रंथांपासून ते आजच्या आधुनिक संपादित ग्रंथांचा ठेवा असलेले सुसज्ज ग्रंथालय म्हणजेच संस्थानचे सिध्दांतसार ग्रंथालय होय. या ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचा अधिक लाभ तर होईलच, किंबहुना ग्रंथ वाचनाची व संकलनाची आवडही निर्माण होईल.

nath-divider-icon-img