nath-sevanidhi-banner-img

सेवानिधी

नरहरिनाथ गुरू सद्गुरू आठवावा ।
ब्रह्मांड पोटी सकळा की रे साठवावा ।।

nath-about-bottom-img
nath-sevanidhi-qr-img
QR CODE आपल्या मोबाईलवर स्कॅन करून आपण खालील पैकी कोणत्याही सेवकार्यात आपला आर्थिक सहभाग नोंदवू शकता.

श्रीसंत नरहरिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव वार्षिक अन्नदान - ₹५००१

प्रतिवर्षी संपन्न होणाऱ्या श्रीसंत नरहरिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवामध्ये दररोज होणाऱ्या नैवेद्य व अन्नदानातील एक दिवसातील एक पंगत आपल्या वतीने होईल.

वार्षिक अन्नदान सेवा- ₹२५००

प्रतिवर्षी सदर देणगी सेवा देऊन वर्षातील एक दिवस आपल्या वतीने मुख्य समाधीस नैवेद्य व वैदिक व वारकरी विद्यालयात अन्नदान होईल. आपण आपल्या स्वेच्छेने आपला दिवस निवडू शकता
(उदाहरणार्थ आपला, आपल्या मुलांच्या अथवा आई वडिलांच्या जन्मदिवस किंवा इतर, स्मृती दिवस इ.)

वार्षिक गोसेवा - ₹११००

प्रतिवर्षी सदर देणगी सेवेतून वर्षातील एक दिवस आपल्या वतीने गोसेवा होईल. यामध्ये एक दिवसाचे गोखाद्य, इत्यादी व्यवस्थापन होईल. या बरोबरच आपण आपल्या स्वेच्छेने देखील गोखाद्य (चारा, ढेप, घास, कुट्टी, इत्यादी) या स्वरूपातही वार्षिक व मासिक योगदान देऊ शकता.

महर्षि वसिष्ठ वेद विद्यालय - ऐच्छिक

संत तुकाराम महाराज वारकरी विद्यालय - ऐच्छिक

श्रावणमास अभिषेक - ₹१५००

श्रावण मासातील प्रत्येक गुरुवार किंवा सोमवारी आपल्या वतीने अभिषेक होऊन आपल्याला प्रसाद पाठविला जाईल.

नियोजित प्रकल्प, भक्तनिवास बांधकाम - ऐच्छिक

वाङ्मय प्रकाशन - ऐच्छिक

ग्रंथालय व यज्ञशाळा - ऐच्छिक

महत्वाचे – देणगीसेवा पाठविल्यावर 9730366021 या नंबर वर आपले संपुर्ण नाव व आपला इच्छित दिवस/तारीख पाठवावी.

‘सत्य संकल्पाचा दाता नारायण’ या संतवचनाप्रमाणे भगवंत सर्व भगवद्भक्तांच्या व दातृत्ववान भाविकांच्या रूपाने हे कार्य करून घेत आहे. या सत्कार्यास लाभलेली प्रत्येक भाविकाची सेवा ती कितीही अल्प असो, ती या सत्कार्याच्या सिद्धीसाठी महत्वाची ठरणार आहे. आपणही यथाशक्ती या धर्म कार्यास सहयोग करून आपल्या परिचितांनाही संमिलीत करावे, हे नम्र निवेदन.

nath-divider-icon-img