देऊळग्रामी वास तुझा भक्त करिती अर्चन ।
जन्मभूमी प्रतिष्ठाण तेथे गुप्त अनुसंधान ।।
श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या तसेच वैदिक व वारकरी परंपरेची, सनातन धर्म परंपरेची सेवा करण्याऱ्या महनीय व्यक्तीस श्रीसंत नरहरिनाथ महाराज यांच्या नावे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. किमान चार तपांहून अधिक काळ ज्यांनी धर्म कार्याकरिता आपले जीवन व्यतीत करून समाजाच्या प्रबोधनासाठी, उत्कर्षासाठी व उन्नतीसाठी अखंडीत कार्य केले अशा व्यक्तींच्या अविरत व अलौकिक सेवाकार्याला वंदन म्हणून व नाथपरंपरेचा कृपाशीर्वाद म्हणून हा पुरस्कार दिला जातो. सन २०१७ पासून प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान समारंभ श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे अथवा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो.
रोख रक्कम ₹११०००/-, महावस्त्र शेला, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असते.
© 2025 Narahari Nath Maharaj Sansthan. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper